स्कूबा डायव्हिंगवेळी दुबईत अभियंत्याचा मृत्यू   

दुबई : दुबईतील जुमेराह समुद्र किनार्‍यावर स्कूबा डायव्हिंग करताना भारतीय इंजिनिअर तरुणाचा मृत्यू झाला. इसाक पॉल ओलाक्केनगिल असे या तरुणाचे नाव आहे. तो मूळचा केरळ येथील आहे. स्कूबा डायव्हिंग करताना त्याला हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर त्याला तातडीने बाहेर काढून रुग्णालयात नेण्यात आले पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. इसाक २९ वर्षांचा होता. या घटनेमुळे त्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
 
ओलाक्केनगिल हा त्याच्या कुटुंबासह सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी दुबईला गेले होते. त्यांची पत्नी रेशम आणि धाकटा भाऊ इविन यांच्यासोबत सुट्टीचा आनंद घेण्यासाठी जुमेराह समुद्र किनारी गेले होते. यावेळी त्यांनी स्कूबा डायव्हिंग करण्याचा निर्णय घेतला.

Related Articles